बहुजन शिक्षक महासंघाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध.. खासदार हेमंत पाटील
"राज्यस्तरीय शिक्षक अधिवेशन"
नांदेड: 24 फेब्रुवारी 20
बहुजन समाजातील शिक्षकांच्या विविध समस्या आहेत अनेक वर्षापासून बहुजन शिक्षण संघटनेच्या समस्या कोणीही सोडण्यास पुढे आले नाही परंतु यापुढील काळात महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या शिक्षण परिषद, राज्य शाहू महाराज शिक्षक पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय अधिवेशनाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी महासंघाचे संस्थापक एस. आर. कांबळे राज्याध्यक्ष बी. एम. हनुमंते, महेंद्र भगत, एम.जे. वारभवन गौतम टाकळीकर, शंकर इंगळेथ, दिनेश कांबळे, चंद्रकांत दांडेकर, एफ वाय बेग, एकनाथ कल्याणकर, गजानन सारोटे, मधुकर सोनवणे, दयानंद मादळे, मधुकर दुवे, शिवाजी पात्रे, सतिश गुळवे, एच. एस. गायकवाड,, अमोल कांबळे, रमेश पाटील, देवाजी भुजाडे, गौतम पंडित, संतोष अंबुळगेकर, संदीप सोनकांबळे यासह अनेकांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी दीपप्रज्वलन आणि राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना खासदार पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ ही संघटना स्वाभिमानी संघटना आहे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी संघटना आहे. शिक्षकांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव संघटनेच्या पाठीशी राहू शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देत असतानाच शिक्षकांनीही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कर्तव्य पार पाडावे. जोपर्यंत ग्रामीण भागातील बहुजनांचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण घेत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. नोकरीशी प्रामाणिकपणा बाळगत शिक्षक संघटनांनी आजचा विद्यार्थी आणि उद्याचा समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या तीनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील 30 हून अधिक शिक्षकांचा खासदार हेमंत पाटील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावते यांनी केले यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.