कविता


     
 
 
   📘 हे संविधाना....📘

---------------------------------------
हे संविधाना....
इथे पेरले तू
बीज समतेचे
स्वातंत्र्याचे अन् प्रगतीचे.  .! 

     हे संविधाना....
     अवतरलास तू
     लेखनीतून बा भिमाच्या   
    स्वप्न साकारण्या कोटी कोटी दीनाच्या. !!

हे संविधाना.......
दिलास न्याय तू
केलस बंधमुक्त
मोडीत काढलेस ते धर्म आणि ग्रंथ. !!! 

       हे संविधाना.....
       तुझ्यात पाहतो मी
       बा भिमाला
       प्रेरणा तव मिळे जन जीवनाला. iv

हे संविधाना......
आधार तू इथल्या 
जन-माणसाचा
श्वास तू इथल्या तन-मनाचा.....v

         हे संविधाना....
         केलास न्याय तू 
         झाले समान सगळे 
         झोळीत टाकले तू आकाश अन् तारे.   vi

हे संविधाना....
तू प्राण देशाचा 
तू सन्मान भारताचा 
तूझाच उद्गाता भिमराव बाप माझा... vii

       हे संविधाना...
      वेशीवरी टांगले तू 
      मनूचे निखारे 
      एकसंघ केले तू संघराज्य भारताचे.  viii

------------*********--------------

  📘    *हे संविधाना.... 📘
_________________________
    प्रिये..... 


तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहेस..

फरक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत,माझ्या विचारात, फक्त तूच आहॆस..

एक सत्य आहॆ, मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ, मी तूला तॆ समजवू शकत नाही...

मी जगतॊय आजही, एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ , मी तूला हरवू शकत नाही..

मी आज गप्प आहे, कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ, कारणं तू झॊपली नाहीस...

मला दुःख नाही, आज माझ्या हरण्याचं
कारण आज मी जरी हरलो, पण तू ही जिंकली नाहीस... 
               
          🌷उपासक🌷






--—---------------------+-----------------------------------










प्रिय अनुराधा. ..
   तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
   नाहीच असं नाही, 
   पण तुझ्या येण्याने
   आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून
   आली….

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…

पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे
 नव्या चैतन्याने सजून गेले…

आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
      आणि
तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !


#वाढदिवसाच्या_प्रेमळ_शुभेच्छा.. !

--------------------------—--------------------------

देश विकताना पाहिला

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी 
माझा देश विकताना पाहिला 
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीला

देशाला घडवण्याचे अमीष दाखवुन
देश दारुत बुडवताना पाहीला 
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझा देश विकताना पाहीला

इतक्या दिवस साड्या ओढणारा
अचानक साड्या वाटताना दिसला
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ 
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी 
माझा देश विकताना पाहीला

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना 
त्याचा जोडा केवढा घासला 
वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला 
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी देश विकताना पाहीला 

लोकशाही ढाब्यावरच बसुन त्याने 
आज दडपशाही मतदानाला आणली 
देशाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी 
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली 

त्या वाहणा-या विषारी दारुत 
मला माझा देशही वाहताना दिसला 
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी 
माझा देश विकताना पाहिला 
कुठे हजारात, कुठे पाचशेत 
बरबाद होताना पाहीला 
(संग्रहीत) 


आज हि तु मला आठवतेस का...

आज हि तु मला मनात साठवतेस का...
सांग ना ग...
आज हि आहेस का
तु तशीच माझ्या परीसारखी
आज हि आहेस का
तु तशीच मला स्वतःत हरवण्यासारखी

सांग ना ग...
आज हि तुझ्या डोळ्यात का
नकळत अश्रू बरसतात
घेऊन बघ ना ग मला मिठीत
मग बघ कसे अश्रू विरतात

सांग ना ग...
सकाळ, संध्याकाळ, रात्र, दुपार
काय मीच आठवतो तुला बेसुमार
आकार, उकार, होकार, नकार
काय माझाच येतो सारखा विचार

सांग ना ग...
आज हि आहे का
तीच जादू तुझ्या डोळ्यात मला बेन्धुंद करण्यासाठी
आज हि दरवळतो का
तो सुंगध तुझ्या सहवासात मला सामावून घेण्यासाठी

सांग ना ग...
आज हि होतेस का
तु बेचैन मला ऐकण्यासाठी
आज हि होतेस का
तु आतुर मला भेटण्यासाठी

सांग ना ग...
आज हि मी आकंठ बुडतो का
तुझ्या आसंवात
आज हि तु तदपतेस का
माझ्या विरहात

सांग ना ग...
आज हि तु लटके-लटके
रागावतेस का माझ्यावर
आज हि तु तेवढेच हटके
प्रेम करतेस का माझ्यावर

सांग ना ग...
आज हि तळमळतो का
जीव तुझा माझ्यासाठी
आज हि होतेस का
कासावीस माझ्यासाठी

सांग ना ग...
आज हि तुला कळतात का
माझ्या मनातील भावना
आज हि तुला दिसतात का
माझ्या डोळ्यातील वेदना

सांग ना ग...
आज हि तुटत का
मन तुझ माझ्यासाठी
आज हि रडतो का
आत्मा तुझा माझ्यासाठी

सांग ना ग...
आज हि तु कावरी-बावरी होतेस का
माझ्या मिठीत असताना
आज हि तु चिंब चिंब भिजतेस का
माझ्या आठवणीत रडताना

सांग ना ग...
आज हि तु अश्रू तिपतेस का
आसावलेल्या नजरेतून
आज हि तु खोटे हसू आणतेस का
निरागस चेहऱ्यातून

सांग ना ग...
आज हि तु रात्री-बेरात्री झोपेत बदबदतेस का
मी तुला का एकटे सोडून गेलो म्हणून
आज हि सकाळी तुला कुणी विचारत का
रात्री तु काय बडबडून गेलीस म्हणून

सांग ना ग...
आज हि तु स्वताला आवरतेस का...
आज हि तु स्वताला सावरतेस का...
आज हि तु क्षणाला क्षण मोजत जगतेस का...
आज हि तु दिवसाला दिवस जोडत जगतेस का...

सांग ना ग...
आज हि तु मला आठवतेस का...
आज हि तु मला मनात साठवतेस का...






किती गं हळवं हे तुझं माझं प्रेम.. 

किती गं हळवं हे तुझं माझं प्रेम
तु वार फुलांचा, मी तुझा न चुकलेला नेम.....


आजही आठवते ती तुझी पहीली अदा
नजर चूकवून तु लाजली, अन् मी  झालो फीदा....

हवेच्या झुळकेने रेशमी केस तुझे विखुरले
ठोका चुकला काळजाचा, पण मी ही मज सावरले.....

आताही जेव्हा ऐकतो, तुझ्या पैंजणांंची रूणझूण
कसं गं सांगु सोन्या, क्षणात जातो मी हरपून....

गर्व करत असेल आज, तो दरपणही स्वत:वर
त्याला बघून तु लाजतेस, मी हसतो माझ्यावर....

तुला भेट देण्यास एक गुलाब विकत घेतो
पण तो तुझ्यावर जळेल म्हणुन स्वत:च लपऊन देतो.....

कीती गं प्रेम हे व्यक्त करु, शब्द अपुरे आहेत.....
तुझ्यावीना राणी माझं जीवन अधुरं आहे.....

हातात तुझा हात घेऊन करेल या जगावर मात
वचन देतो आज, मी देईल जन्मभर साथ..



चुक माझीच

 जाऊ दे जे झालं ते झालं,
  चुक तशी माझीच होती....
तुझ्या सोबत जगण्याची
एक मात्र इच्छा होती,
पण...ती या जन्मी तरी
पुर्ण होण्यासारखी नव्हती
  
जाऊ दे ग ..
चुक तशी माझीच होती...
  सर्व काही केल असतं ग ,
पण तु हातात हात कधी दिलाच नाही..
मी समजवण्याचा प्रयत्न करत राहिलो 
पण...तु ही प्रत्येक क्षणी नाकारत राहिलीस..

जाऊ दे ग ...
चूक तशी माझीच होती...
या जन्माच राहु दे आता
पण... पुढच्या जन्मी नक्की नक्की
  तु माझीच होशील...

#तरीपण... तुला काय वाटतं 
खरंच का चूक माझी होती...?