म. रा.बहुजन शिक्षक महासंघाची बैठक संपन्न.
लातूर : 20 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र राज्य बहूजन शिक्षक महासंघाचे लातूर जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे जिल्हा अध्यक्ष आयु. दिनेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पदाधिकारी आयु. ज्ञानोबा बोडके सर व आयु. शिवानंद सुर्यवंशी सर हे उपस्थित होते.
बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने…
🔷 राज्य शाखेने संघटनेच्या कायदेविषयक प्रलंबित बाबींची पूर्तता करून घेतल्याबद्दल राज्याध्यक्ष मा.गौतमजी टाकळीकर साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
🔷 जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत महासंघाची भुमिका विशद करण्यात आली व लवकरच महासंघ यासाठी आंदोलन करणार आहे.
🔷 प्रमोशन, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
🔷 संघटनात्मक बांधणी व सभासद नोंदणी या विषयावर चर्चा करण्यात आली.
🔷 अहमदपूरचे तालुकाध्यक्ष मा. हनुमान सिसोदे सर यांनी सभासद नोंदणी मध्ये आघाडी घेतल्या बद्दल त्यांचे व अहमदपूर टिमचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी जमा निधी जिल्हाशाखेकडे सुपुर्त केला.
✨ मा. प्रकाश भालेराव सर जिल्हाकार्याध्यक्ष यांनी संघटनात्मक विविध बाबींवर आपले मत व्यक्त केले. सर्वाना सोबत घेऊन महासंघ अधिक जोमाने वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असे सर्वानुमते ठरले.
✨ उपस्थित तालुकाध्यक्ष मा. हनुमान सिसोदे सर, अहमदपूर, मा. विनोद कांबळे तालुका अध्यक्ष देवणी मा. जंपावाड सर, तालुकाध्यक्ष उदगीर मा. किशोर शिंदे तालुका अध्यक्ष लातूर मा. अमोल कांबळे सचिव रेणापूर मा. शिवानंद सुर्यवंशी विभागीय नेते , मा. शिवाजी पात्रे सर जिल्हासचिव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप जिल्हाध्यक्ष आयु. दिनेश कांबळे यांनी केले.
✨🔷🌹🌺🌼🌷🥀🌸🌼🌺