क्षणभंगुर स्वप्ने
का व्हावे असे
मन हे माझे स्वैर झुकावे..
आता नाही आस, ना ध्यास
तरीही त्याने मला का छळावे..
मी सोडून दिली ती वाट,
मनाचा हे घाट
तरीही त्याने का शोधावी पुसट
झालेली वाट..
आता नकोय मला,
अधुरी स्वप्ने,
रक्ताळलेल्या श्वासांची..
असेल ओढ या मनाची
स्वप्नातल्या आकांक्षेची,
जरी झाली जीर्ण तरीही
फुंकर हवी तव तुझं प्रेमाची.
का मी द्यावी साद तुजला
का मी पहावे स्वप्न तुझे
तु तर सखे सरिते सम
हिम असूनही खिसत जावे.
असतील स्वप्ने तुझी तरीही
का भुरळ मज त्याची व्हावी...
मी तर सखे स्वप्न वेडा
तरीही क्षणभंगुर ती का व्हावी..
का व्हावे असे
मन हे माझे स्वैर झुकावे..
आता नाही आस, ना ध्यास
तरीही त्याने मला का छळावे..
मी सोडून दिली ती वाट,
मनाचा हे घाट
तरीही त्याने का शोधावी पुसट
झालेली वाट..
आता नकोय मला,
अधुरी स्वप्ने,
रक्ताळलेल्या श्वासांची..
असेल ओढ या मनाची
स्वप्नातल्या आकांक्षेची,
जरी झाली जीर्ण तरीही
फुंकर हवी तव तुझं प्रेमाची.
का मी द्यावी साद तुजला
का मी पहावे स्वप्न तुझे
तु तर सखे सरिते सम
हिम असूनही खिसत जावे.
असतील स्वप्ने तुझी तरीही
का भुरळ मज त्याची व्हावी...
मी तर सखे स्वप्न वेडा
तरीही क्षणभंगुर ती का व्हावी..